Tuesday 25 June 2013

०६ आणि ०७ जुलै २०१३ रोजी "किल्ले राजमाची"

किल्ले राजमाची येथे दुर्गभ्रमण

नमस्कार मित्रहो ,

ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि :- ०६ आणि ०७ जुलै २०१३ रोजी "किल्ले राजमाची" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि ०६ जुलै रोजी ठाण्याहून प्रस्थान राजमाची येथे आणि तेथे मुक्काम आणि ०७ जुलै रोजी परत येणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील. 

इतिहास :- सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा या डोंगररांगांमुळे निर्माण झालेला परिसर "उल्हास नदीचे खोरे " म्हणून ओळखला जातो. याच उल्हास नदीच्या खोर्यांच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस १५ किमी अंतरावर किल्ले राजमाची वसलेला आहे. कल्याण नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोर घाटमार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग ;जसा नाणेघाट तसाच बोरघाट ..त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या  प्रमाणात वाहतूक चालत असे. याच व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी व जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा सर्वात प्रामुख्याने उपयोग केला जाई. तसेच या किल्ल्याच्या आग्नेय बाजूस साधारण ३ कि.मी अंतरावर "कोंडाणा लेणी " आहे. हि लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात म्हणजे सातवाहन काळाच्या सुरवातीला खोदलेली आहे. या लेण्याच्या समुहात एक चैत्यगृह  आणि सात विहारांचा समावेश आहे.

 दुर्गभ्रमण आराखडा :-दिवस पहिला:- ०६-०७-२०१३
 १) दुपारी १:३० ला ठाणे पश्चिम जवळील मांगो शोरूम पाशी भेटणे.
 २) दुपारी २:०० ला ठाण्याहून प्रस्थान किल्ले राजमाची येथे.
३) सायंकाळी ४ वाजता कोंदिवडे गावात.
४) सायंकाळी ५ वाजता कोंदिवडे गावातून किल्ले राजमाची चढण्यास सुरवात
५) कोंडाणा लेणी पाहून ८:३० ते ९:३० च्या दरम्यान गडावरील उधयवाडीत दाखल.
५) रात्रो १० वाजता भोजन कार्यक्रम
६) कॅम्प फायर , चर्चा रात्रो १२ पर्यंत आणि झोपी जाणे दिवस

दुसरा:- ०७-०७-२०१३
१) वेक उप कॅल:- ६:०० वाजता प्रातविधी आणि आल्पोहार सकाळी ७:१५ पर्यंत
२) गडफेरी सकाळ ७:३० ते दुपारी १:०० पर्यंत.
३) भोजन कार्यक्रम दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान
४) दुपारी ३:०० गडावरून उतरण्यास सुरवात आणि कर्जत येथील कोंडाणा गावात येथे आगमन सायंकाळी ५:३० वाजता
 ५) कोंडाणावरून सायंकाळी ६:३० ला निघून ८ ते ९ च्या दरम्यान ठाणे येथे आगमन.

 वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG **
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES **
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY
४) अंथरून पांघरून / PERSONAL BEDDINGS. **
5) पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट  / WINDCHEATER **
6) टोर्च, आणि काही सुकी कपडे स्वतासाठी/ TORCH , DRY CLOTHS. **
7) १ लिटर पाण्याची बाटली / ATLEAST 1L WATER BOTTLE **
8) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
9) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.

 ** compulsaey / (आवश्यक गोष्टी) 

दुर्गभ्रमण फी :- ११५० रु प्रत्येकी ( यात ठाणे राजमाची ठाणे प्रवास,जेवण नाश्ता नि चहा )

 दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा

संपर्क / CONTACT ::

सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
मकरंद केतकर 8698950909/ MAKARAND KETKAR : 8698950909. (पुणे)


** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील

**CONDITIONS APPLY
**ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS

No comments:

Post a Comment