Saturday 17 August 2013

" किल्ले कोथळीगड " येथे २५ ऑगस्ट


दुर्गसखा आयोजित " किल्ले कोथळीगड " येथे २५ ऑगस्ट २०१३ रोजी दुर्गभ्रमण 


ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी "कोथळीगड " येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. 

दि २५ ऑगस्ट २०१३ रोजी ठा याहून प्रस्थान कोथळीगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे 

कोथळीगड :- 

उंची ४७२ मीटर/१५५० फूट ,
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी बिकट
ठिकाण महाराष्ट्र
जवळचे गाव पेठ(ता.कर्जत जि.रायगड)
डोंगररांग कर्जत-भिमाशंकर

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा.माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.

दुर्गभ्रमण आराखडा / TREK PLAN:-


२५/०८/२०१३ रोजी
१) सकाळी ६.०० वाजता ठाणे स्टेशन येथे भेटणे. / 6.00
२) सकाळ ६.३० ला ठाणे येथून कर्जत येथे प्रस्थान / START AT 6.30AM THANE TO KARJAT
३) सकाळ ८.३० वाजता कर्जतला पोहोचून पुढे आंबिवली जीप किंवा बसने पोहोचणे अथवा
कर्जत वरुन ठरवलेले वाहन घेऊन कोथलीगडाच्या पायथ्याशी पेठ या गावी ९.३०
पर्यंत पोहोचणे . / 9.30 AM REACH BASE VILLAGE.(VIA AUTO / JEEP).
४) सकाळी १०.०० पर्यंत सकाळची न्याहरी करुन गड चढ यास सुरवात करुन १२.०० च्या आसपास गडाच्या माथ्यावर . दुर्गभ्रमण करुन परत गड उतरायला घेणे. ०४:३० पर्यंत परत पायथ्याशी येउन नाष्टा करुन निघणे / BREAKFAST N START HIKE TILL 12.00 AM REACHED TOP SITE SEEING N START DESCENDING. REACH BASE VILLAGE TILL 4:30 PM
५) सायंकाळी ०६.३० वाजेपर्यंत पुन्हा कर्जत स्टेशन गाठणे व ०६.४० ची ठाणेसाठी लोकल ट्रेन पकडणे आणि सायंकाळी 8.00 या आसपास ठाणे येथे परतणे / REACH KARJAT STATION BY 6.30 (KARJAT-THANE TRAIN 6:40PM) N REACH THANE SYATION
BY 8.00 PM

दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY


१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG 
२) चांगली पादत्राणे,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ). 
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY 
४) विंड चिटर / wind chitar
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE 
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारी वर )/ CAMERA (AT YOU OWN RISKS) 
७) वह पेन... आपणास काह लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL. 


दुर्गभ्रमण फी :- ४५० रु प्रत्येकी ( यात कर्जत आंबिवली कर्जत प्रवास , चहा आणि जेवण ) 

नियम व अटी :


* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे

संपर्क : 
मनोज चव्हाण : ९७७३४२११८४ मकरंद केतकर : ८६९८९५०९०९
चेतन राजगुरू : ९९८७३१७०८६ सुबोध पाठारे : ९७७३५३७५३२


www.durgasakha.org

No comments:

Post a Comment